Donald Trump : ट्रम्प यांनी इजिप्त-इथिओपियाच्या वादामध्ये मध्यस्थीची ऑफर दिली, नाईल नदीच्या पाणीवाटपाचा वाद सोडवण्याचा प्लॅन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाईल नदीच्या पाण्यावरून इजिप्त आणि इथिओपिया यांच्यातील सुरू असलेल्या वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते दोन्ही देशांदरम्यान अमेरिकेची मध्यस्थी पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत.