PM Modi : PM मोदी म्हणाले- 21वे शतक 140 कोटी भारतीयांचे असेल; आत्मनिर्भर भारताचे व्हिजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करेल, तेव्हा तो “विकसित भारत” असेल. “मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की २१ वे शतक हे भारताचे १४० कोटी भारतीयांचे शतक असेल,” असे ते म्हणाले.