Arvind Kejriwal, : केजरीवालांवर प्रश्न विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण; गुजरात आप प्रदेशाध्यक्षांच्या सभेतील घटना
गुजरातमधील मोरबी येथे आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीत अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल एका तरुणाला पक्षाच्या एका कथित कार्यकर्त्याने थप्पड मारली. सोमवारी मोरबी येथे ही घटना घडली. ‘गुजरात जोडो अभियान’ अंतर्गत ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष इशुदान गढवी येथे रॅलीचे आयोजन करत होते.