Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची कुठलीही चौकशी नसल्याची माहिती दिली.