Aadhaar-PAN : ओळखपत्रांसाठी संयुक्त पोर्टल आणणार; आधार-पॅनमध्ये आता एकाच वेळी नाव-पत्ता-नंबर बदलेल
आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी आता लोकांना वेगवेगळ्या कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येणार नाही. केंद्र सरकार युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टिम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या पोर्टलवर एकाच ठिकाणी पत्ता, नंबर आदी अपडेट करता येईल. सर्व आवश्यक ओळखपत्रांमध्ये हे बदल ऑटोमॅटिक अपडेट होतील.