Aadhaar card : आधार कार्डावरील पत्त्याच्या आधारे रुग्णांना मुंबईतील सरकारी रुग्णलयात सेवा पुरवावी – मनसे
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. आमच्या एका अभ्यासानुसार ही संख्या वर्षाला ३० ते ३५ लाख रुग्ण हे इतर राज्यातून येतात. याचा परिणाम म्हणजे या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्येमुळे, इथली व्यवस्था पार कोलमडली आहे आणि त्यामुळे मुंबईतील नागरिकांना उपचार मिळत नाहीत. हे चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा पुरावा म्हणून आधारकार्डावरील पत्त्याच्या आधारे रुग्णांना मुंबईतील सरकारी रुग्णलयात सेवा पुरवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली.