Naugaon Police Station : जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलिस ठाण्यात स्फोट, 7 ठार; दिल्ली स्फोटातील टेरर मॉड्यूलमधून जप्त स्फोटकांच्या टेस्ट दरम्यान ब्लास्ट
जम्मू – काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११:२० वाजता मोठा स्फोट झाला. यात सात जणांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींपैकी बहुतेक पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्यावर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.