Bangladesh : बांगलादेशात 5.7 तीव्रतेचा भूकंप, 3 जणांचा मृत्यू, 200 जण जखमी; आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
शुक्रवारी सकाळी १०:०८ वाजता (भारतीय वेळेनुसार) बांगलादेशला ५.७ तीव्रतेचा भूकंप झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाचे केंद्रबिंदू ढाक्यापासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादी येथे होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दहा मजली इमारत बाजूला झुकली. बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला.