Tahawwur Rana, : दहशतवादी तहव्वूरची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढली; NIAने पुरवणी आरोपपत्र दाखल केले
दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी १३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी राणाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालय १३ ऑगस्ट रोजी या आरोपपत्रावर सुनावणी करणार आहे.