ISRO : इस्रो प्रमुख नारायणन म्हणाले- गगनयानचे 90% काम पूर्ण, 2027च्या सुरुवातीला सुरू होईल मिशन
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख व्ही. नारायणन यांनी गुरुवारी सांगितले की, भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे, गगनयानचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे अभियान २०२७ च्या सुरुवातीला लाँच केले जाईल.