Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात धावत्या बसला आग, 20 जिवंत जळाले; 40 प्रवासी होते स्वार
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खासगी बसला आग लागली. वृत्तसंस्था एएनआयनुसार, या अपघातात २० प्रवासी जिवंत जळाले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही संख्या २५ इतकी आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. मृतांचा आकडा वाढू शकतो.