LNG-Powered Train : देशातील पहिली एलएनजी ट्रेन धावण्यासाठी सज्ज; एकदा टाकी पूर्ण भरल्यावर 2200 किलोमीटरपर्यंत धावेल, डिझेलच्या तुलनेत तीनपट खर्च कमी
भारताच्या रेल्वे सुविधांमध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे. कारण देशातील पहिली लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) वर चालणारी ट्रेन अहमदाबादला पोहोचली आहे. या हायटेक ट्रेनची खास गोष्ट अशी आहे की, ती एकदा पूर्ण भरलेल्या टाकीत 2200 किलोमीटरपर्यंतचे लांब अंतर कापण्यास सक्षम आहे.