Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवादी ठार, 3 जवान शहीद; मोदी-शहांच्या स्ट्रॅटेर्जीनंतर चौथ्या दिवशी मोठी चकमक
छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बीजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. याचवेळी, चकमकीत DRG चे 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले आहेत. बस्तर रेंजचे IG सुंदरराज पी. यांनी याची पुष्टी केली आहे.