Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आज दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहू शकले नाहीत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, त्यांना परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत १०० कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणासंदर्भात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.