ISRO : इस्रो प्रमुख म्हणाले- भारत 40 मजली उंच रॉकेट बनवतोय; 75,000 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असेल
इस्रो जगातील सर्वात मोठ्या रॉकेटपैकी एक बनवण्याची तयारी करत आहे. मंगळवारी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, अंतराळ संस्था ४० मजली इमारतीइतके उंच रॉकेट बनवत आहे. हे रॉकेट ७५,००० किलो म्हणजेच ७५ टन वजन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम असेल.