Bengal : बंगालमध्ये चिट फंड कंपनीमार्फत ₹350 कोटींची फसवणूक; आरोपी TMC अल्पसंख्याक विंग अध्यक्षांचा मुलगा
पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यात, ३,००० हून अधिक लोकांशी ३५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी चिट फंड कंपनी स्थापन केली, लोकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवले आणि नंतर सर्व पैसे घेऊन पळून गेले.