• Download App
    झाेमॅटाे डिलीव्हरी बाॅयला काेयत्याने मारहाण करुन लुटमारीचा प्रकार Zomato delivery Boy beaten by four unknown persons near balewadi and theft his cash and mobile

    झाेमॅटाे डिलीव्हरी बाॅयला काेयत्याने मारहाण करुन लुटमारीचा प्रकार

    झाेमॅटाेची डिलीव्हरी देऊन परत जात असलेल्या एका तरुणाला बालेवाडी परिसरातील निकमार काॅलेज हाॅस्टेल जवळ दाेन दुचाकीवरुन आलेल्या चार अनाेळखी इसमांनी अडवले. त्याला सदर इसमांनी मारहाण करुन त्याच्यावर काेयत्याने वार करत त्याच्या जवळील ऐवज लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. Zomato delivery Boy beaten by four unknown persons near balewadi and theft his cash and mobile


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -झाेमॅटाेची डिलीव्हरी देऊन परत जात असलेल्या एका तरुणाला बालेवाडी परिसरातील निकमार काॅलेज हाॅस्टेल जवळ दाेन दुचाकीवरुन आलेल्या चार अनाेळखी इसमांनी अडवले. त्याला सदर इसमांनी मारहाण करुन त्याच्यावर काेयत्याने वार करत त्याच्या जवळील ऐवज लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी साैरभ उत्तम गंगणे (वय-२१,रा.काळेवाडी,पुणे) याने चार अनाेळखी इसमां विराेधात चतुश्रृंगी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    साैरभ गंगणे हा झाेमॅटाे डिलीव्हीरीचे काम करताे. १२ एप्रिल राेजी दुपारी सव्वा दाेन वाजण्याच्या सुमारास ताे बालेवाडी परिसरात झाेमॅटाे डिलीव्हरी देण्याकरिता आला हाेता. डीलीव्हरी देऊन ताे परत जात असताना दाेन माेटारसायकलवरुन आलेले चार अनाेळखी इसमांनी त्याच्या जवळ येऊन ‘ए थांब थांब, चिखलीला जायचा रस्ता सांग’ असे म्हणत त्याचे गाडी समाेर गाडी आडवी लावुन हातात काेयता असणाऱ्या एका मुलाने त्याच्यावर काेयत्याने वार केला. ताे साैरभ याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसल्यामुळे ताे अचानक झालेल्या हल्लयाने खाली जमिनीवर पडला.

    त्यावेळी एका मुलाने त्याच्या मागील डावे बाजूच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून त्यातील १७०० रुपये राेख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, दाेन एटीएम कार्ड, एक माेबाईल व सॅकबॅग असा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन गेले आहे. याबाबत चतुश्रृंगी पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक महेश भाेसले करत आहे.

    Zomato delivery Boy beaten by four unknown persons near balewadi and theft his cash and mobile

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…