या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा तांत्रिक आणि आर्थिक अहवाल स्वत: रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी तयार केला आहे .
अहवाल तयार करण्यासाठी अनेक दिवस ते रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागत असे .Zojila tunnel: Great success for MEIL; Excavation of Zojila tunnel tube 2 completed; Nitin Gadkari woke up at night and prepared his own report
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर ते लेह लडाख या सर्व हवामान मार्गासाठी (All Weather Road) बांधण्यात येत असलेल्या झेड मोड बोगद्याच्या ट्यूब 2 च्या खोदकामाचे काम सोमवारी पूर्ण झाले. त्याचे काम ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाले होते.मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) टीमने जम्मू-काश्मीर-लडाख प्रदेशात ऑल वेदर रोड झोजिला बोगद्याचे बांधकाम केले आहे .पर्वतांमध्ये बोगदा काढणे हे नेहमीच कठीण काम असते, परंतु MEIL ने दोन्ही बोगदे सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेग या सर्वोच्च मानकांसह एका वेळेत डिझाइन केलेत.
नॉर्वे, स्वीडन, इटली आणि फ्रान्समध्ये बांधलेल्या बोगद्यांचा त्याच्या बांधणीपूर्वी अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी देशातील टीमने या देशांमध्ये जाऊन तेथे राहून अभ्यास केला, त्यांचे तंत्र समजून घेतले. त्यानंतर कामाला सुरुवात केली.
या प्रकल्पाची एकूण लांबी 32 किमी असून, त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत.
हे बोगदे मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) द्वारे बांधले जात आहेत. सर्व हवामान रस्ते 2024 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.
दुसऱ्या ट्युबचं खोदकाम पूर्ण
प्रकल्पाचा पहिला भाग 18 किमी सोनमर्ग आणि तलतालला जोडतो, त्यात मोठे पूल आणि दोन बोगद्यांचा समावेश आहे.
दोन ट्युब असलेल्या टनेल टी 1, ट्युब 1 चे काम दिवाळीनिमित्त 4 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाले आणि सोमवारी दुपारी दुसरी ट्युब पूर्ण झाली.
खोदकाम करताना पाणी मुरवण्याचे काम आव्हानात्मक होते. सध्या 2 किमी लांबीच्या ट्युबचे खोदण्याचे काम जोरात सुरू असून, एप्रिल 2022 पर्यंत हे खोदकाम पूर्ण होईल. 13.3 किमी लांबीच्या झोजिला मुख्य बोगद्याचे कामही जोरात सुरू आहे. MEIAL ने लडाखच्या 600 मीटर पुढे आणि काश्मीरच्या बाजूने 300 मीटर काम पूर्ण केलेय.
काय म्हणाले गडकरी?
झोजिला बोगद्यात सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ठिकठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येणार असून, त्यामुळे कोणत्याही वाहनाला आग लागल्यास आपोआप अलार्म वाजेल.
आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉल केले जातील. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
याशिवाय देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षही तयार करण्यात येणार आहे.