• Download App
    Zhurong Rover : चीनच्या झुरॉंग रोव्हरने आपल्या लँडरसह मार्सवर ग्रुप सेल्फी घेतला Zhurong Rover : China's Zhurong Mars rover took a group selfie with its lander

    Zhurong Rover : चीनच्या झुरॉंग रोव्हरने आपल्या लँडरसह मार्सवर ग्रुप सेल्फी घेतला ; धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी

    • झुरॉंग हा चीनचा पहिला मंगळ रोव्हर आहे 

    • चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत.

    वृत्तसंस्था

    बिजींग: चीनमधील मार्स रोव्हर Zhurong ने मे मध्ये मंगळावर लँडिग केले होते. तेव्हापासून तो यूटोपिया प्लॅनिटिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशाल मार्टियन लावाच्या मैदानातील भूगोलशास्त्रांचा अभ्यास करीत आहे.Zhurong Rover : China’s Zhurong Mars rover took a group selfie with its lander

    चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो जारी केलेत. यात मंगळ ग्रहावरील धुळ आणि डोंगराळ भागात चीनचा राष्ट्रीय ध्वज लावलेला हा चीनचा रोव्हर दिसत आहे .

    सीएनएसएने मंगल ग्रहावरील 4 फोटो शेअर केलेत. यात झुरोंग रोव्हरचा वरचा भाग दिसत आहे. प्लॅटफॉर्ममधून बाहेर निघण्याआधीचंही दृष्य यात पाहायला मिळतं आहे.

    जुरोंग रोव्हरने जवळपास 10 मीटर अंतरावर आपला रिमोट कॅमेरा लावला आणि अनेक फोटो काढले .

    चीनने मागील महिन्यात मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर रोव्हरसोबत तियानवेन-1 अंतराळ यान उतरवलं होतं. याआधी हे यान जवळपास 3 महिने मंगळाच्या कक्षेत होतं.

    अमेरिकेनंतर मंगळावर अंतराळ यान पाठवणारा चीन जगातील दुसरा देश आहे. यानाच्या ऑर्बिटर आणि लँडर दोन्हींवर चीनचा राष्ट्रध्वज आहे. 6 पायांचं चीनच रोव्हर मंगळावरील युटोपिया प्लानिशिया या भागाची पाहणी करत आहे.

    Zhurong Rover : China’s Zhurong Mars rover took a group selfie with its lander

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार