• Download App
    योगराज सिंगांच्या हेट स्पिचशी युवराज सिंग असहमत; शेतकरी आंदोनलावर चर्चेतून तोडगा काढण्याला पाठिंबा | The Focus India

    योगराज सिंगांच्या हेट स्पिचशी युवराज सिंग असहमत; शेतकरी आंदोनलावर चर्चेतून तोडगा काढण्याला पाठिंबा

    योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनातील भाषणात हिंदू समाज आणि महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – भारताचा विक्रामवीर क्रिकेटपटू युवराज सिंग याचाही आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने केलेल्या ट्विटमधून शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहेच, पण आपले वडील आणि प्रसिद्ध वेगवान गोलंदाज योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनात दिलेल्या हेट स्पीचपासून अंतर देखील राखले आहे. किंबहुना योगराज सिंग यांनी दिलेल्या हेट स्पीचशी आपण सहमत नसल्याचे युवराज सिंगने स्पष्ट केले आहे. yuvraj singh distances himself from hate speech of father yograj singh



     

    योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनातील भाषणात हिंदू समाज आणि महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. हिंदूंनी मुघलांना आपल्या महिला दिल्या वगैरे बेछूट विधाने त्यांनी केली होती. या विधानांशी सहमत नसल्याचे युवराज सिंगने स्पष्ट केले आहे.

    या ट्विटमध्ये युवराज सिंग म्हणतो, की असा कोणताही मुद्दा किंवा समस्या नाही की सामंजस्याच्या चर्चेतून सुटू शकत नाही. आपल्यात कितीही मतभेद असले तरी ते सामंजस्याने सोडविता येतात यावर माझा विश्वास आहे. माझे वडील योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनात केलेले भाषण हे त्यांचे व्यैयक्तिक विचार आहेत. त्यांच्याशी मी सहमत नाही.

    yuvraj singh distances himself from hate speech of father yograj singh

    केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यातील चर्चेतून ठोस तोडगा निघावा आणि शेतकरी आंदोलनाची समाधानकारक समाप्ती व्हावी, अशी मी वाढदिवशी देवाकडे प्रार्थना करतो, अशी समंजस भूमिकाही युवराज सिंगने ट्विटमधून मांडली आहे. युवराज सिंगच्या सोशल मीडियातून भरघोस पाठिंबा मिळतो आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??