• Download App
    उत्तर प्रदेशातील कोरोना रोखण्याच्या योगी आदित्यनाथ मॉडेलचे ऑस्ट्रेलियातही कौतुक Yogi Adityanath's model of corona prevention in Uttar Pradesh is also appreciated in Australia

    उत्तर प्रदेशातील कोरोना रोखण्याच्या योगी आदित्यनाथ मॉडेलचे ऑस्ट्रेलियातही कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने कोरोना रोखण्यात यश मिळविले. योगी आदित्यनाथ मॉडेलचे ऑस्ट्रेलियातही कौतुक होत आहे. Yogi Adityanath’s model of corona prevention in Uttar Pradesh is also appreciated in Australia

    उत्तर प्रदेशातील करोना विषाणूच्या घटत्या रुग्णसंख्येबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मॉडेलचे ऑस्ट्रेलियन खासदार क्रेग केली यांनी कौतुक केले आहे. त्यांनी योगींना कर्जाच्या स्वरुपात मदत मागितली आहे.



    उत्तर प्रदेशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी इव्हरमेक्टिनच्या वापराबद्दल क्रेग केली यांनी मुख्यमंत्री योगीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला कळवा की करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये कमी करण्यासाठी इव्हर्मेक्टिन हे औषध वापरले जाते, त्याचा काय उपयोग झाला. त्यांनी म्हटले आहे की
    भारतातील उत्तर प्रदेश राज्य. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येथे आणण्यासाठी काही मार्ग आहे का? जेणेकरून इथली इव्हर्मेक्टिनची समस्या संपेल. क्रेग यांचे हे ट्विट खूपच पसंत व्हायरल झाले आहे.

    १० जुलैपासून हे जवळपास साडेतीन हजार वेळा रीट्वीट झाले आहे. क्रेग केली यांनी एका ट्विटला उत्तर म्हणून हे ट्विट केले आहे त्या ट्विटमध्ये असे सांगितले गेले होते की, भारतातील १७ टक्के लोक उत्तर प्रदेशमध्ये राहतात. गेल्या ३० दिवसात, कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी केवळ २.५ टक्के मृत्यू उत्तर प्रदेशात झाला आणि १ टक्क्यांहून कमी संक्रमित येथे आढळले. तर भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ९ टक्के लोक महाराष्ट्रात वास्तव्य करतात. महाराष्ट्रात करोनाचे १८ टक्के रुग्ण आढळले आणि ५० टक्के बाधितांचा मृत्यू झाला.

    उत्तर प्रदेश सरकारच्या मते, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे १२५ नवीन बाधित समोर आले आहेत. त्याच वेळी १३४ लोकांनी करोनावर मात केली आहे. आता उत्तर प्रदेशात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या १ हजार ५९४ वर आली आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर ९८.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

    Yogi Adityanath’s model of corona prevention in Uttar Pradesh is also appreciated in Australia

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य