• Download App
    काल:हॉर्न-आक्रोश-7सेकंद थरकाप अन् 'त्याची' एंट्री ; आज:डॅशिंग-दबंग-सुपरमॅन टाळ्यांचा कडकडाट अन् 'त्याची' एंट्री ! Yesterday: Horn-outcry-7 seconds tremor and 'his' entry; Today: Dashing-Domineering-Superman applause and 'his' entry

    काल : हॉर्न-आक्रोश-7सेकंद थरकाप अन् ‘त्याची’ एंट्री ; आज : डॅशिंग-दबंग-सुपरमॅन टाळ्यांचा कडकडाट अन् ‘त्याची’ एंट्री

    • लोकलमध्ये लहानसहान वस्तू विकणार्या संगीता शिरसाट हया अंध आहेत .त्य मुलासोबत वांगणी स्थानकात फलाटावर चालताना अंदाज न आल्याने अगदी कडेला गेल्या आणि त्यांचा मुलगा साहिल रुळावर पडला. त्याचवेळी कर्जतहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी उद्यान एक्स्प्रेस स्थानकात शिरली. हॉर्न ऐकून संगीता यांनी मदतीसाठी आक्रोश केला.
    • तो ऐकताच मयूर शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुळावरून धावत मुलाला फलाटावर ढकलले आणि स्वतःही कसेबसे फलाटावर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा खेळ सर्वांच्या हृदयाचा थरकाप उडवणारा ठरला. यावेळी त्यांच्यापासून उद्यान एक्स्प्रेस अवघ्या काही फुटांवरच होती.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:एक अंध महिला मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात आपल्या छोट्या मुलाचा हात पकडून चालत होती. अचानक मुलाचा हात आईच्या हातातून सुटतो आणि मुलगा रेल्वे रुळावर जाऊन पडतो. समोरुन यावेळेस कर्जतहून मुंबईच्या दिशेने वेगवान लोकल याच रुळावर येत होती. आई मुलाला वाचवण्यासाठी ओरडत असते.

    पण ती असहाय्य होते. या थरारक घटनेने क्षणभर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण ड्यूटीवर असलेले पॉईटमॅन मयूर शेळके रुळावरुन धावत जातात आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मुलाला रुळावरुन उचलून फलाटावर ठेवतात. त्यांनी स्वतःही पटकन फलाटावर उडी मारली आणि रेल्वे पुढे निघून गेली.Yesterday: Horn-outcry-7 seconds tremor and ‘his’ entry; Today: Dashing-Domineering-Superman applause and ‘his’ entry

    हे कोणत्या एका चित्रपटातले दृश्य नसून वास्तवात घडलेली घटना घडना आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

    पॉईटमॅन मयूर शेळके यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही मयूर शेळके यांचे कौतुक केले. मयूर शेळके हा कर्जत तालुक्यातील तळवडे गावचा रहिवासी आहे. तसेच ते वांगणी रेल्वे स्थानकात पॉईंटमॅन म्हणून कार्यरत आहेत.

    मयूर शेळके आज सर्वांच्या नजरेत रियल हिरो आहे. ‘मी ड्युटीवर असताना मुलाला रेल्वे रुळावर पडलेले पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. मुलाला रुळावरुन उचलून फलाटावर ठेवले.’ असे शेळके यांनी सांगितले.

    शेळके ६ महिन्यांपूर्वीच रेल्वेत रुजू झाले आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल आणि धाडसाबद्दल त्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग कार्यालयात टाळ्या वाजून स्वागत करण्यात आले.

    एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट डेव्हलमेंटने शेळके यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. तर मुलाच्या आईने म्हटले आहे की, मी त्यांना जितक्या वेळा धन्यवाद देईन ते त्यांच्या धाडसापुढे कमीच आहे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता माझ्या मुलाला वाचवले.

    माझ्या मुलाला वाचवणाऱ्या मयूर शेळके यांच्यात मला देव दिसला. मी आंधळी असले तरी मला हा थरार न बघताही अनुभवता आला. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संगीता शिरसाट यांनी सरकारकडे केली आहे.

    Yesterday: Horn-outcry-7 seconds tremor and ‘his’ entry; Today: Dashing-Domineering-Superman applause and ‘his’ entry

    त्या मातेचा आक्रोश कानी पडला तेव्हा केवळ मुलाला वाचविणे हेच माझ्या मनात होते. त्यामुळे या घटनेत आपल्या जिवाचे बरेवाईट होईल याची चिंता मनात बिलकूल नव्हती. एका अंध मातेच्या मुलाला वाचविल्याचे समाधान मिळाले आणि आनंद झाला-मयूर शेळके, रेल्वे पॉइंट्मन

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य