अर्चना अर्थात पूजाअर्चा ही काही फक्त ब्राह्मण समाजाची मक्तेदारी नाही. विविध समाजांचे घटक त्याच्याशी पक्केपणाने जोडले आहेत. त्याची यादीच नाशिकचे पुरोहित श्री. मुकुंद खोचे यांनी दिली आहे. या संदर्भातले एक खुले पत्र त्यांनी महाराष्ट्र शासन आणि सर्व लोकप्रतिनिधींना लिहिले आहे. ते पत्र जसेच्या तसे…!!Worship is not just a monopoly of Brahmins
– मा. मंत्रिमंडळ, सर्व लोकप्रतिनिधी महाराष्ट्र शासन,
महोदय,
स. न.
जसे शासनातील सर्व मंत्रिमंडळ काम करते पण तर त्या बरोबर अतिशय मोठी सर्व प्रशासकीय यंत्रणा पण काम करत असते परंतु चेहरा मात्र मंत्रिमंडळाचा असतो त्या प्रमाणे समाजातील सर्वच जाती जमातीतील सुयोग्य विचार, उचित निर्णय आणि सम्यक् कृती करणारी माणसं असतात ती त्या समाजाचा चेहरा होतात. त्याचप्रमाणे धर्म परंपरेचे रक्षण त्याचे कालानुरूप योग्य अर्थ, सारासार विवेकबुद्धीने विचार करून त्यामागील कृती समाजास सांगणे आणि ती करून घेणे व समाजाचे सामाजिक, भौतिक व अध्यात्मिक पोषण करणे हे सर्व समाजाचे कार्य असते.
आम्ही पुरोहित म्हणून देश, धर्म आणि परंपरा याचा कालानुरूप सुसंगत विचार करून समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन पूजा करण्याचा अधिकार त्याची जाण व योग्य ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आजपर्यंत आम्ही केलेल्या कामाचा समाज वर्गवारीनिहाय लेखाजोखा आपणापुढे मांडीत आहे. समाजातील ज्या वर्गाला आजपर्यंत अर्चना {पूजा अर्चा करण्याचे ज्ञान } करण्याचे ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केला आहे, अर्थातच तो केवळ प्रातिनिधिक असाच आहे; या शिवाय अनेकांनी वेगवेगळे प्रयत्न केले आहेतच!
समाजात घडलेल्या कार्याचा असा हिशेब आपणास देण्यात आम्हाला आनंद होत आहे. ज्या जाती पूजा व मंदिरे या विषयाशी जोडल्या गेल्या आहेत त्या जातींची संख्या पुढील प्रमाणे आहे. ती आपण पहावी. आवश्यक वाटल्यास तपासावी !
१} मेहतर २
२} पारधी २
३} वारली २८
४} कोळी ३
५} मोची ५०
६} लमाण १५
७} पद्मशाली २
८} मातंग २७
९} खेर १
१०} धनगर ११
११} लिंगायत ३
१२} नीळकंठ १
१३} वाल्मिकी १
१४} नाभिक ३
१५} वडार १८
१६}कोष्टी २
१७} गोंधळी १
१८} भिल्ल ७
१९} टकारी १
२०} हिंदू कोकणी १२
२१} फासे पारधी ४
२२} गुरव १
२३} मरीमाई वाणी १
२४} मराठा कुणबी ४
२५} जंगम १
२६} मान्ग २३
२७} कोकणी ५३
२८} ढोर २
२९} रंगारी २
३०} मसण जोगी ३
३१} कुन्ची कुरवे २
३२} तळवाट १
३३} महादेव कोळी १५
३४} वाटली ३
३५} हिंदू महार ३
३६} जोशी २
३७} चांभार ३
३८} लोहार २
३९} ओतारी १
४०} स्वकुळ साळी १
४१} लोधी १
४२} मंडप१
४३} तोंगरी २
४४} माळी १
४५} सुवर्णकार १
४६} बोलाई १
४७} गवळी १
४८} कोटकू १
४९} माडीया १
५०} वलई १
५१} कातकरी २
५२} वीरशैव १
५३} आगरी १
५४} ब्राह्मण १
५५} बंजारा १
५६} फुलारी१
५७ }गोसावी २
५८} भोई १
५९} एलम १
६०} मराठा ३
६१}बहुरुपी १
६२}मराठी आई १
जी संख्या लिखित स्वरूपात व लगेचच उपलब्ध आहे ज्याची छाननी आपण करू शकता, तेच मी आपणास देत आहे.
आदरणीय भुजबळ साहेब, आता सांगा आपण हा “धंदा” करताना कोणते आरक्षण ठेवले आहे ?? आमची आपणास नम्र विनंती आहे की कृपा करून हिंदू समाजात दुही व भेद पसरवून “फोडा व झोडा “चे काम करू नका!
आता मात्र आपणास खुले आव्हान देतो की मुस्लिम समाजातील किती मागासवर्गीय लोक मौलवी किंवा धर्मगुरुचे काम करीत आहेत? त्याचा जरुर शोध घ्या आणि समाजाला दिसू द्या. सोबत आपले मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री व “मम भार्या समर्पयामि…!!” चा “शोध” लावणारे “आधुनिक समाजशास्त्रज्ञ” लोकप्रतिनिधी यांना सुद्धा या शोध कार्याला जोडून घ्या!
पुन्हा एकवार क्षमादान असावे अन्यथा “समतावादी ब्रिग्रेड” यांचे “दर्शन” झाले तर कुठल्या हाताने आपणास नमस्कार करू शकेन अथवा तोंडाने आपणास काही सांगू शकेल…?? असं ऐकलय की “साहेबांच्या पुढे आणि ** मागे उभे राहू नये!!”
आपला मतदार नागरिक
मुकुंद खोचे