• Download App
    घरबसल्या काम करा, पैसा कमवा |Work from home, earn money

    मनी मॅटर्स : घरबसल्या काम करा, पैसा कमवा

    गेल्या काही वर्षांत घरबसल्या कामाची नवी पद्धती वेगाने रुढ होत चालली आहे. वाढते शहरीकरण आणि झपाटय़ाने प्रगती करणारे माहिती तंत्रज्ञान यांमुळे नवनवीन रोजगार क्षेत्रे विकसित झाली आणि नवनव्या उद्योग संधी निर्माण झाल्या. कोरोनामुळ यासा अधिक मोठ्या प्रमाणात गती आली. कामाचे स्वरूप अधिक गतिमान होत गेले. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी रोजच्या रोज जाऊन निर्धारित वेळात काम करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घरच्या घरी तेच काम पूर्ण करण्याचा सोयीस्कर आणि रास्त पर्याय पुढे आला आणि वर्क फ्रॉम होम ही नवीन कार्यपद्धती लोकप्रिय झाली.Work from home, earn money

    कोरोनाने त्याला अफाट गती दिली आहे. घरून काम करीत असताना काम देणाऱ्या व्यक्तींशी त्यांच्या कार्यालयातील अन्य व्यक्तींशी, परिणामकारक संवाद साधण्यासाठी उत्तम संवादकौशल्य विकसित करणे गरजेचे ठरते. संगणक, आणि तत्संबंधी अन्य उपकरणे उत्तमरीत्या हाताळता येणे, तसेच त्यांच्यातील बिघाड ओळखण्याची आणि दुरुस्त करण्याचे जुजबी ज्ञान आवश्यक असते, कारण घरून काम करीत असताना सहकारी आणि तंत्रज्ञांची तत्काळ मदत घेणे शक्य नसते. सध्या अनेक क्षेत्रात घरबसल्या कामाची पद्धत चांगली रुढू झालली आहे.

    त्यातील महत्वाचे क्षेत्र म्हणजे व्हर्च्युअल असिस्टंट हे होय. या व्यक्ती कंपनीच्या कार्यालयात न जाता, घरूनच कंपनीला कारभारविषयक सेवा पुरवतात. उदा. कंपनीचे अकाउंट्स सांभाळणे, डाटा एन्ट्री, ऑनलाइन रिसर्च, ग्राहक कंपनीतर्फे ईमेल्स पाठवणे, सहल कंपन्यांसाठी रीसर्च वर्क, उद्योग क्षेत्रातील संशोधन करणे इत्यादी.

    मात्र त्यासाठी योग्य ते ज्ञान व वेळेचे नियोजन गरजेचे असते. ते मिळवले तर तुम्ही घरात बसून अगदी दुसऱ्या शहरातीलच नव्हे तर देशातील व्यक्ती किंवा संस्थेसाठी उत्तम प्रकारे काम करू शकता. तंत्रज्ञानामुळे हे सारे शक्य झाले आहे. गरज आहे ते तंत्रज्ञान योग्य प्रकारे शिकण्याची व अंमलात आणण्याची. यामुळे पैसे तर भरपूर मिळतातच शिवाय ते वाचतातही तितकेच.

    Work from home, earn money

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!