• Download App
    Women's World Cup:लहान बाळासह मैदानावर पाकिस्तानची कर्णधार मरूफ बिस्माह ! भारतीय खेळाडूंनी दिले चिमुकलीला प्रेम अन् काढले सेल्फी... Women's World Cup: Pakistan captain Maroof Bismah on the field with a baby! Handled by Indian players

    Women’s World Cup:लहान बाळासह मैदानावर पाकिस्तानची कर्णधार मरूफ बिस्माह ! भारतीय खेळाडूंनी दिले चिमुकलीला प्रेम अन् काढले सेल्फी…

    सहा महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन बिस्माह मारुफ खेळतेय विश्वचषक स्पर्धा.


    आई आणि कॅप्टन, दुहेरी जबाबदारी निभावणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूचं होतंय कौतुक


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महिला विश्वचषक स्पर्धेत मिथाली राजच्या भारतीय संघाने पाकिस्तानवर मात करत धडाकेबाज सुरुवात केली. भारताने हा सामना जिंकला असला तरीही सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय ती पाकिस्तानी संघाची कर्णधार बिस्माह मारुफची अन् भारतीय महिला संघांची.भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामन्यासोबतच अनेकांची मनेही जिंकली.Women’s World Cup: Pakistan captain Maroof Bismah on the field with a baby! Handled by Indian players

     

    हा सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानची कर्णधार मरूफ बिस्माह ही तिच्या लहान बाळासह मैदानावर दाखल झाली होती.

    मुलीला सहकारी खेळाडूंकडे सोपवून मरूफ मैदानावर उतरली. सामन्यानंतर भारतीय खेळाडू एकता बिस्त ही पाकिस्तानी ड्रेसिंग रुमच्या समोर उभ्या असलेल्या या बाळासह खेळताना दिसली आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला.

    भारतीय महिला संघालाही या छोट्या पाहुण्यासोबत फोटोसेशन करायचा मोह आवरला नाही. भारतीय महिलांनी पाकिस्तानी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन बिस्माहच्या बाळासोबत चार निवांत क्षण घालवत फोटोसेशन केलं.

    बिस्माह या स्पर्धेत आपल्या सहा महिन्यांच्या लहान बाळाला घेऊन सहभागी झाली आहे. आपल्या बाळाला ड्रेसिंग रुममध्ये ठेवत बिस्माहने आजचा सामना खेळला.

     

    Women’s World Cup: Pakistan captain Maroof Bismah on the field with a baby! Handled by Indian players

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार