भारतीय सैन्यात ‘ती ‘चा प्रवास अशा वेळी सुरू झाला जेव्हा अजूनही महिला कॅडेट्स अधिकारी पारंपारिक साड्यांमध्येच दिसत.
कडक युनिफॉर्म..वरती बांधलेले केस ..लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर जेव्हा कडक आवाजात सर्वांना विचारतात , “How’s the Josh?!”… Womens Day Special How the Josh Maharashtra daughter Madhuri Kanitkar
शब्दांकन : माधवी अग्रवाल
डॉ. माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत आहेत . उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत. इतकंच नाही तर पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे. चला तर मग भेटूयात महाराष्ट्राच्या हिरकणीला … थेट युद्धभूमीची कहाणी..
जुलै २०२१ मध्ये लेफ्टनंट जनरल माधुरी राजीव कानिटकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली . माधुरी कानिटकर या देशातील तिसऱ्या महिला अधिकारी आहेत ज्यांना लष्कराचा ३-स्टार रँक देण्यात आला.
डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३८ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतात.
माधुरी कानिटकर ह्या भारतीय सशस्त्र दलात लेफ्टनंट जनरल या पदावर पोहोचणार्या तिसर्या महिला व बालरोग तज्ञ आहेत. त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.
भारतीय लष्करात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते. अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.असे माधुरी सांगतात.
सैन्यात फक्त कुटूंब नाही तर संपूर्ण सेना एक कुटुंब आहे त्यामुळे या कुटुंबाला सांभाळून घेण्यासाठी महिलांची गरज आहे
माधुरी सांगतात की बर्याच वेळा असे घडले की त्यांच्या मुलांची काळजी सहकार्यांनी घेतली. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी माधुरी हजर नव्हत्या. त्यावेळी त्यांचा जोडीदार वडिलांसोबत होता.
‘‘भारतीय लष्कराचे कामकाज महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करता पारदर्शक, न्याय्य असून महिलांना तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी निश्चितच मिळते. लष्करी वेशात असतानाही प्रत्येक दिवस मुलाच्या उत्साहात आनंदाने साजरा करा, अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.’’
माधुरीचे धैर्य बर्याच वेळा कमकुवत झाले पण त्यांनी कधीही हार मानली नाही. माधुरी सांगतात की जेव्हा मुले लहान होती, तेव्हा त्यांना असे वाटले की त्यांनी घराबाहेर जाऊ नये. त्यावेळी आई-वडिलांनी आणि पतीने त्यांना प्रोत्साहन दिले .
3स्टार अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाइस अॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना आहे. त्यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या, तर माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल झाल्या आहेत.
Womens Day Special How the Josh Maharashtra daughter Madhuri Kanitkar