• Download App
    Women’s Day : झारखंड काँग्रेस महिला आमदाराचा अनोखा अंदाज; घोडेस्वारी करत पोहोचल्या विधानसभेत पहा व्हिडिओ Women’s Day: Congress MLA Amba Prasad rides a horse to Jharkhand Assembly 

    Women’s Day : झारखंड काँग्रेस महिला आमदाराचा अनोखा अंदाज; घोडेस्वारी करत पोहोचल्या विधानसभेत पहा व्हिडिओ

    झारखंडच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद (Jharkhand congress MLA Amba prasad) चर्चेत आल्या आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगभरात महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक महिलांच्या अनोख्या शैलीचे सुप्त गुणांचे दर्शन या निमित्ताने झाले .महिला दिनानिमित्त झारखंडच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद  यांनी देखील हटके अंदाजात प्रवेश केला  त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे त्या घोड्यावर स्वार  होऊन विधानसभेत दाखल झाल्या. अंबा प्रसाद यांचा घोडेस्वारी करत विधानसभेत जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.Women’s Day: Congress MLA Amba Prasad rides a horse to Jharkhand Assembly 

    अंबा प्रसाद यांनी घोडेस्वारी करताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “फक्त आजचाच नाही तर रोजचाच दिवस आमचा महिलांचा असतो.  महिला दिनाचं औचित्य साधत मी घोडस्वारी करण्याचा निर्णय घेतला कारण समाजाच्या विचारसरणीत बदल व्हावा असं मला वाटतं. सर्वच क्षेत्रांत महिलांची भागीदारी वाढावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना खूप शिकवावं, महिलांचं योगदान सर्वच क्षेत्रांत वाढावं, यासाठी पालकांनी त्यांना शिक्षण द्यावं.” तसंच घोडेस्वारी आपल्याला खूप आवडते, असंही अंबा प्रसाद म्हणाल्या.

    “प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा, झाशीची राणी आहे, महिलांनी प्रत्येक आव्हानाला सामर्थ्याने सामोरं जावं. महिला प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत असल्याने पालकांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले पाहिजे,” असंही अंबा प्रसाद म्हणाल्या.

    कोण आहेत आमदार अंबा प्रसाद?

    अंबा प्रसाद या बरकागाव येथील माजी आमदार निर्मला देवी आणि योगेंद्र साओ यांची मुलगी आहे. त्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बरकागाव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या. त्या निवडून आल्या तेव्हा त्या केवळ 28 वर्षांच्या होत्या. अंबा प्रसाद या झारखंडमधील सर्वांत तरुण महिला आमदार आहेत. त्यांचे वडील साओ हे माजी मंत्री असून, ते झारखंडच्या मंत्रिमंडळाचा भाग होते.

    Women’s Day: Jharkhand Congress Women MLA’s unique prediction; Watch the video of the assembly arriving on horseback

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार