वृत्तसंस्था
मुंबई : उंच इमारतीत राहणाऱ्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली असून दाटीवाटीत राहणारे आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्याचे समोर आले आहे. Women topped the immune system
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षण अहवालात ही माहिती उघड झाली. संपूर्ण मुंबईत प्रथमच केलेल्या सर्वेक्षणात 36 टक्के नागरिकांमध्ये कोरोना रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण 35 टक्के तर महिलांमध्ये 37 टक्के आहे.
10 हजार 197 नागरीकांच्या रक्ताचे नमूने तपासले. यात रक्तांमध्ये कोविड विषाणू विरोधात अँटिबॉडीजचा अभ्यास केला. रक्तात अँटिबॉडीज तयार होणे म्हणजे आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार होणे. अशी रोगप्रतिकार शक्ती मुंबईतील 36.30 टक्के नागरिकांमध्ये आढळली. आतापर्यंत तीनदा सर्वेक्षण झाले असून मार्च 2021 मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या लोकांची चाचणी केली आहे.
महिला अधिक सक्षम
पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती आढळली आहे. 35.02 टक्के पुरुषांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे तर 37.12 टक्के महिलांमध्ये ती आढळली.