वडीलांचा मित्र घरी ये-जा करत असल्यामुळे ओळख झालेल्या एका महिलेचे संबंधित व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. मात्र त्याने दुसऱ्या मित्रासह महिलेला ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करत अश्लील व्हिडिओ केला. आक्षेपार्ह व्हिडिओ साेशल मिडियावर टाकण्याची धमकी देत आर्थिक फसवणूक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -वडीलांचा मित्र घरी ये-जा करत असल्यामुळे ओळख झालेल्या एका महिलेचे संबंधित व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. मात्र त्याने दुसऱ्या मित्रासह महिलेला ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करत अश्लील व्हिडिओ केला. आक्षेपार्ह व्हिडिओ साेशल मिडियावर टाकण्याची धमकी देत त्यांनी महिलेच्या नावावर असलेले राे-हाऊस विकण्यास लावून त्याचे पैसे न देता तिची आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार विमानतळ पाेलीसांकडे दाखल झाली आहे. Women exploits sexual and economical offence registered in police station
याप्रकरणी पुरुषाेत्तम लाल बुटानी (रा.लाेहगाव,पुणे) व वासुदेव पाटील (रा.लाेहगाव,पुणे) या दाेन आराेपींवर बलात्कार व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४० वर्षीय पिडित महिलेने पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. सदर पिडितेचा पुरुषाेत्तम बुटानी हा मित्र असून त्याचे महिले साेबत प्रेमसंबंध निर्माण झाले हाेते. त्यानंतर महिलेला तिच्या पतीपासून वेगळे रहाण्यास भाग पाडत बुटानी हा तिच्यासाेबत लाेहगाव येथे लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये एकत्रित राहु लागला. त्यानंतर त्याने त्याचा माजी पाेलीस कर्मचारी असलेला मित्र वासुदेव पाटील याच्यासाेबतीने महिलेला वेगवेगळया ठिकाणी नेऊन तिच्यासाेबत दाेघांनी शारिरिक संबंध प्रस्थापित केले.
पाटील याने यासंर्दभातील व्हिडिओ रेकाॅर्डिंग करुन ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेच्या नावावर असलेले राे-हाऊसची मालमत्ता विकण्यास जबरदस्तीने भाग पाडले. तिला दुसरा फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन भाडयाचे खाेलीत हलविण्यात आले परंतु तिला घर विक्री करुन आलेले पैसे न देता तसेच तिचे शारिरिक, मानसिक व आर्थिक शाेषण केल्याप्रकरणी आराेपी विराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास विमानतळ पाेलीस स्टेशन करत आहे.
Women exploits sexual and economical offence registered in police
महत्त्वाच्या बातम्या
- बहुतांश राज्ये ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प मोहीम वेगात
- गोवेकरांच्या झोपेची चिदंबरम यांना चिंता; “झोपलेली” काँग्रेस उठवा; प्रमोद सावंतांचे प्रत्युत्तर!!
- Green Refinery : राजापूर परिसरात जमीन व्यवहारात शिवसेनेचा हात, म्हणूनच नाणार ऐवजी बारसूचा प्रस्ताव; नितेश राणेंना संशय!!
- ED Action : जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेण्याच्या ईडीच्या प्रक्रियेला सुरुवात; अजित पवारांच्या वाढल्या अडचणी!!
- मुंबई महापालिकेत पोलखोल अभियान राबवून भाजप काढणार शिवसेनेचे वाभाडे