• Download App
    चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाचा मदतीने काढला काटा Wife and 16 yrs son killed father in katraj area, police Arrested the accused

    चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाचा मदतीने काढला काटा

    पुण्यातील कात्रज येथे एका महिलेले चक्क मुलाच्या मदतीने आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – पुण्यातील कात्रज येथे एका महिलेले चक्क मुलाच्या मदतीने आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर दोघांनीही मिळून मृतदेह चक्क लोखंडी पाईपाला लटकवला होता.पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाचा मदतीने काटा काढल्याची बाब उघडकीस आली आहे.याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तर मुलगा १७ वर्षाचा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. Wife and 16 yrs son killed father in katraj area, police Arrested the accused

    प्रकाश किसन जाधव (वय-४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शालन जाधव (३७)असे आरोपी पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश जाधव यांचा मृतदेह एका खांबाला गळफास घेतलेला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरवातीला संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला होता.

    पोलीसांनी हा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवीला होता.त्यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात जाधव यांचा गळा दाबून तसेच डोक्यावर मारहाण करुन खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला शोधण्याकरिता तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. या दरम्यान हा खून जाधव यांच्या पत्नीने त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. पत्नीला अटक करण्यात आली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक संगीता यादव या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

    Wife and 16 yrs son killed father in katraj area, police Arrested the accused

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…