• Download App
    : तापमानातील वाढ सर्वांसाठी चिंताजनक का ? Why the rise in temperature is worrying for everyone

    विज्ञानाची गुपिते : तापमानातील वाढ सर्वांसाठी चिंताजनक का ?

    आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा माणसाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह आहे. त्यामुळे हरितगृह परिणामांकडे वेळीच लक्ष न दिल्यास मानवी अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट होण्याची भीती आहे. माणूस निसर्गात बदल करतोय हे खरं आहे. तो कसा ते आपण पाहू.Why the rise in temperature is worrying for everyone

    प्रत्येक भूचर प्राण्याचा व वनस्पतीचा वातावरणाशी सतत संबंध असतो. हे वातावरण, जे फक्त पृथ्वीवरच उपलब्ध आहे वा अस्तित्वात आहे, ते विविध वायू, धूलिकण व जल बाष्पाने बनले आहे. या घटकांचा वातावरणाशी ठराविक प्रमाण असते.

    उदाहरणार्थ यांत नत्र ७८ टक्के व प्राणवायू वीस टक्के प्रमुख असून इतर वायुंमध्ये हायड्रोजन, हेलियम, ओझोन, निऑन, झेनोन, मिथेन इत्यादींचा समावेश होतो. नैसर्गिक वादळ, भूकंप, ज्वालामुखी, वणवा आणि मानवनिर्मित स्वयंचलित वाहनांचा धूर, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व वायू, शेकोट्या, केर जाळणे, आगी इत्यादी कारणांमुळे वायूंच्या प्रमाणात फेरबदल होऊन वातावरणाचे संतुलन बिघडत आहे त्यामुळे मानवी जीवनावर आणि वनस्पती जीवनावर परिणाम घडून येत आहेत.

    शास्त्रज्ञांच्या मते एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीचे तापमान एक ते साडे तीन अंश सेल्सिअसने वाढेल. ही एवढीशी तापमानातील वाढ चिंताजनक का ठरते? कारण काही सहस्त्र वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग होते. तेव्हाचे तापमान आजच्या फक्त दोन सेल्सिअसने कमी होते. वातावरणातील अगदी किरकोळ बदल दीर्घकाळ टिकले तरी त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.

    हरितगृह परिणामामुळे मिथेन वायू उत्सर्जित होत आहे. त्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता. कार्बन डायऑक्साइड पेक्षा पंचवीस पट जास्त आहे. सीएफसी वायू फ्रीज, एसी यातून उत्सर्जित होतो. सारख्या वायूमुळे ओझोन थर पातळ होत आहे. त्यामुळे दीडशे वर्षांपूर्वी पेक्षा सद्ध्या तीन टक्के अधिक अतिनील किरणे पृथ्वीवर येत आहेत. परिणामी उष्णता वाढत आहे.

    या कारणांमुळे सागराची पातळी तीस ते साठ सेंटीमीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक सागरी बेटे, तसेच समुद्र काठावरील शहरे पाण्याखाली जाऊ शकतात. तसेच यामुळे दोन्ही ध्रुवावर हिमाच्छादीत प्रदेश अकासत चालला आहे. तसेच सागरी वादळाची संख्या वाढत असून अनेक ठिकाणी पूर येत आहेत.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!