गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आता सुरु होतील. हिवाळा सुरु झाला, थोडी थंडी पडली की आपण स्वेटर, मफलर, हातमोजे याचा आसरा शोधू लागतो. आपणच काय पण आपल्या आजूबाजूचे पाळीव प्राणीही थंडीत काकडून जाता. शक्य तितके ते निपटित पडून राहण्याचा प्रयत्न करतात. पण काही प्राणी मात्र त्याला अपवाद असतात. त्यातीलच एक म्हणजे पोलर बियर म्हणजे पांढरी शुभ्र अस्वले.Why don’t bears get cold even in heavy snow
ही अस्वले चक्क बर्फातही दंगामस्ती करतात. तेथे अन्य प्राणी टिकावच धरू शकणार नाहीत. बर्फाळ प्रदेशातील पोलर बियर्स म्हणजे निसर्गाची एक अद्भुद रचनाच म्हणावी लागेल. निसर्गानेच या पोलर बिअर्सच्या शरीरात संरक्षणाची अनोखी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे ते या विचित्र हवामानात तग धरुन राहू शकतात. प्रत्येक प्राण्याचे शरीरातील उष्णतामान कायम रहावे यासाठी निसर्गानेच स्वतंत्र रचना केलेली असते. शरीराच्या या विशिष्ठ रचनेला होमिओस्टसिस असे म्हणतात. खूप जीवघेणी थंडी असेल तर या अस्वलांच्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
त्यामुळे रक्ताचा प्रवाह कातडीपर्यंत पोहचतच नाही. हे गरम रक्त जर कातडीपर्यत पोहोचले तर रक्त लगेच थंड होवूऩ शरीराचे उष्णनामानही तत्काळ कमी होईल. निसर्गाच्या या अनोख्या रचनेमुळे बाहेर कितीही थंडी असली तरी अस्वलाच्या शरीरातील रक्त उष्णच राहते. त्याचप्रमाणे या अस्वलांच्या कातडीखाली मोठ्या प्रमाणात चरबी साठविलेली असते.
या चरबीच्या आवरणामुळे शरीरातील उष्णता बाहेर जात नाही ती कायम राहते. या अस्वलांच्या अंगावर प्रचंड प्रमाणात केस देखील असतात. या अतिकेसाळ व केसांच्या जाड आवरणामुळे बाहेरील थंडी शरीराच्या आत रक्तापर्यंत जात नाही व अस्वलाचे रक्त गरम राहते. त्यामुळे कितीही जीव गोठणारी थंडी असली तरी अस्वलावर त्याचा विपरित परिणाम होत नाही.