• Download App
    सुर्यास्तावेळी सूर्य तांबडा का दिसतो|Why does the sun look red at sunset?

    विज्ञानाची गुपिते : सुर्यास्तावेळी सूर्य तांबडा का दिसतो

    जेव्हा प्रकाशकिरण अत्यंत लहान आकाराच्या कणावर पडल्यावर सर्व दिशांना पसरतो. याला प्रकाशाचं विकिरण म्हणतात. आकाश निळे दिसण्यामागचा मूळ संबंध वातावरणातून प्रकाशाच्या विकिरणाशी आहे. दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीच्या तुलनेत हवेतील वायूंचे रेणू आणि वातावरणातील इतर सूक्ष्म कणांचे आकार खूपच लहान असतात. ज्या वेळी सूर्यप्रकाश वातावरणातून जातो त्या वेळी या सूक्ष्म कणांमुळे कमी तरंगलांबीच्या निळ्या रंगाचे जास्तीतजास्त प्रमाणात विकिरण होते. विकिरण झालेला हा प्रकाश आपल्याला दिसत असल्याने आकाश निळे भासते.Why does the sun look red at sunset?

    आपण घरात साध्या प्रयोगातूनही हे पाहू शकतो. याला लागणारे साहित्य एक टॉर्च, चौकोनी काचेचा ग्लास, एक कप दूध. ग्लास टेबलावर ठेवा. त्यात दोन तृतियांश पाणी भरा. आता ग्लासमध्ये अर्धा कप दूध ओता. पाणी आणि दुधाचे मिश्रण स्थिर झाल्यानंतर टॉर्चचा उजेड ग्लासच्या बाजूने सोडा. ग्लासच्या बाजूने टॉर्चचा प्रकाश झोत कसा दिसतो ते पाहा. प्रकाशझोत निळा दिसतो.आता प्रकाशझोताच्या विरुद्ध दिशेने पाहा. प्रकाश पिवळसर दिसेल. आता आणखी थोडे दूध ग्लासमध्ये ओता. आणखी एकदा टॉर्चचा प्रकाशझोत बाजूने पाहा, तो अधिक निळा दिसेल.

    प्रकाशझोताच्या विरुद्ध बाजूने तो भगव्या तांबड्या रंगाचा दिसेल. ग्लासमधून शिरताना प्रकाशझोत विस्तारल्याचे दिसेल. प्रकाशझोत बाजूने निळा आणि समोरून तांबडा का दिसतो. याचे उत्तर सोपे आहे. कोणताही अडथळा नसेल तर प्रकाश सरळ रेषेत जातो. फक्त पाणी भरलेल्या ग्लासमधून बाहेर येणारे प्रकाशकिरण फारसे विस्फारत नाहीत, पण त्यांना कोणत्याही पदार्थाचा अडथळा आल्यास ते विस्फारतात. दुधामध्ये असलेल्या अनेक कणांमुळे तुम्हाला प्रकाशकिरण विस्फारलेले दिसतील. पांढरा प्रकाश सात विविध रंगांच्या किरणांमुळे बनला आहे.

    त्यातील सर्वात लहान तरंग लांबीचा रंग निळा आणि सर्वाधिक तरंग लांबी तांबड्या रंगाची आहे. दुधातील कणांमुळे प्रकाशाच्या विस्फारण्यास प्रकाश प्रकीर्णन म्हणतात. आकाश निळे दिसणे म्हणजे सूर्याचा प्रकाश बाजूने पाहण्यासारखे आहे. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला सूर्य तांबडा दिसतो, तेव्हा तुम्ही सूर्य सरळ समोरून पाहता. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण लांबच्या मार्गाने पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सूर्य तांबडा दिसतो.

    Why does the sun look red at sunset?

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!