प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते व रात्री दिवस संपतो. पण खरे पाहिले तर तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये राहता व वाढता त्यावर दिवसाची सुरुवात ग्राह्य धरली जाते. भारतात हिंदु धर्मीयांना विचाराल तर ते सुर्योदयापासून दिवस सुरु होतो असेच सांगतील. ख्रिस्ती धर्मीयांच्या समजुतीप्रमाणे मध्यरात्रीच्या ठोक्याला नवा दिवस सुरु होतो. म्हणून तर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्या वर्षांच्या आगमनाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रामुख्याने युरोप व अमेरिकेतील ही परंपरा आता जग जवळ आल्यामुळे साऱ्या जगात पाळली जात आहे.Why does the Greenwich Mean Time, the world’s standard time, pass only through the sea?
इस्लाम व ज्यू धर्मीय मात्र सूर्यास्त ही एका दिवसाची अखेर व दुसऱ्या दिवसाची सुरुवात असे मानतात. त्यामुळे प्रत्येकाची दिवसाच्या सुरुवातीची व्याख्या वेगवेगळी आहे. त्यातही जगात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी वेळ असते. जागतिक प्रमाण वेळ ही स्थानिक वेळेपेक्षा वेगऴी असते. जागतिक प्रमाणवेळेनुसार सांगायचे झाल्यास ग्रिनीच या शून्य अंश रेखांश असलेल्या शहरात ज्यावेळी मध्यरात्र होते त्यावेळी नवा दिवस सुरु झाला असे मानायला हवे. भारताची वेळ या वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.
म्हणजेच ग्रिनिच येथे जेव्या मध्यरात्र होते त्यावेळी भारतात पहाटेचे साडे पाच वाजलेले असतात. ग्रिनीचला मध्यरात्र होते त्यावेळी अंदमान निकोबारवर सूर्याची पहिली किरणे पडलेली असतात. त्यामुळे सतत जगप्रवास करणाऱ्या लोकांना सतत आपल्या घड्याळाच्या वेळा त्या त्या ठिकाणानुसार बदलाव्या लागतात. जागतिक प्रमाणेवळेनुसार सुर्योदय प्रथम होतो तो आतरराष्ट्रीय वाररेषेवर पण सर्वांच्या सोयीसाठी या रेषेची अशी आखणी केली आहे की ती महासागरावरुन जाईल. कोणत्याही देशाच्या भूभागावरुन ही रेषा जात नाही.
कारण तसे झाले तर मोठ्या देशाच्या दोन भागांत निरनिराळे वार व तारखा येतील. मात्र संशोधकांनी अत्यंत कसोशीने व प्रयत्नपूर्वक विचार करीत वेळ रेषेची आखणी केली आहे. त्यामुळे जगाचे कामकाज योग्य प्रकारे चालले आहे. या कामी महासागरांची मोठी मदत होत आहे हे मात्र नक्की.