• Download App
    ग्रेट-भेट : जेव्हा दोन दिग्गज भेटतात... Olympics Medal Winner मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकरची भेटWhen two veterans meet ... Olympics medal winner Mirabai Chanu meets Sachin Tendulkar

    ग्रेट-भेट : जेव्हा दोन दिग्गज भेटतात… Olympics Medal Winner मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकरची भेट

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई: टोकियो ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली आहे . मीराबाईने यासंदर्भातला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.दोन दिग्गजांना एकत्र पाहून नेटकरी आनंदी झाले आणि ह्या भेटीचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर देखील करण्यात आले आहेत.When two veterans meet … Olympics medal winner Mirabai Chanu meets Sachin Tendulkar

    यावेळी सचिनने मीराबाईचं रौप्यपदक पाहिलं. मीराबाईचं कौतुकही केलं.

    टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकाचं खातं उघडलं होतं. वेटलिफ्टींग प्रकारात 49 किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने दुसरं स्थान पटकावलं. कर्नम मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टींग प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी मीराबाई चानू पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.

    मीराबाईने पदक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने तिचं कौतुक केलं. मीराबाई चानूने करून दाखवलेली कामगिरी अविश्वसनीय आणि अतुलनीय आहे. दुखापत झाल्यानंतरही ज्या पद्धतीने मेहनत घेऊन तिने स्वतःला सावरलं आणि ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकलं हे उल्लेखनीय आहे. भारताला तुझ्या कामगिरीचा अभिमान वाटतो असं म्हणत सचिनने तिचं कौतुक केलं.

    When two veterans meet … Olympics medal winner Mirabai Chanu meets Sachin Tendulkar

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते