आपला प्रशस्त फ्लॅट असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण घर घेताना काही बाबी माहिती असणे गरजेचे असते. बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगमधे फ्लॅट बुक करताना सॅम्पल फ्लॅट कडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे फ्लॅट खरेदी करणाऱ्याला आपला फ्लॅट प्रत्यक्षात कसा असू शकेल याची कल्पना येते.When booking a flat, be sure to take care of it
सॅम्पल फ्लॅटवरून फ्लॅटची जागा आणि डायमेन्शनचा अंदाज येतो. बिल्डर हे बँका आणि एनबीएफसीकडून कर्ज घेतात आणि बँकांपाशी प्रोजेक्ट गहाण ठेवला जातो. फ्लॅट खरेदी करताना जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट बँकेच्या बिल्डरच्या खात्यावर जर चेक द्यायला सांगितला तर हे निश्चित समजावं की प्रोजेक्ट बँकेकडे गहाण ठेवला आहे. अशा प्रकारच्या प्रोजेक्टमधे फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेचे विनाहरकत प्रमाणपत्र लागते. या एनओसीमध्ये तुमच्या फ्लॅटचे वर्णन केलेले असावे.
उदा. तुमच्या फ्लॅटचा नंबर, इमारत इत्यादी. बिल्डर बँकेकडून घेतलेले कर्ज फेडू शकला नाही तर बँक प्रोजेक्टचा ताबा घेऊ शकते आणि फ्लॅट खरेदीदारास फ्लॅट मोकळा करण्यास सांगू शकते. एनओसीमुळे जर खरेदीदाराने आपल्या फ्लॅटची पूर्ण किंमत दिली असेल तर बँक त्या फ्लॅटवर कब्जा करू शकत नाही. फ्लॅट खरेदी करताना किमतीच्या बाबतीतही अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरची विश्वासार्हता, त्याचे मागील प्रोजेक्ट आणि त्यातील डिलिव्हरी रेकॉर्ड पाहणे आवश्यक असते.
कित्येक जण बांधकाम चालू असलेल्या प्रोजेक्टमधे फ्लॅट खरेदी करतात कारण रेडी टू मूव्ह किंवा तयार फ्लॅटच्या किमती आणि बांधकाम चालू असलेल्या फ्लॅटच्या किमतीत बराच फरक असतो. या फ्लॅटच्या किमती तयार फ्लॅटच्या तुलनेत खूप कमी असतात. पण तुम्हाला स्टॅम्प डय़ुटी, प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन यासाठी खर्च करावा लागतो, याशिवाय इलेक्ट्रिक मीटर, गॅस कनेक्शन, फर्निंशिंगचा खर्च, फिटिंगचा खर्च, याखेरीज काही बदल करायचे असतील तर त्यासाठीही पैसे खर्च करावे लागतात.