• Download App
    पंकजा मुंडे : जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री ते विधान परिषद उमेदवारी हा प्रवास राजकीय उंची गाठणारा आहे?? की...??|What will really Pankaja munde get with rebellion mood of her supporters?

    पंकजा मुंडे : जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री ते विधान परिषद उमेदवारी हा प्रवास राजकीय उंची गाठणारा आहे?? की…??

    पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांविरुद्ध जोरदार हल्लाबोल देखील चालवला आहे. ते रस्त्यावर उतरून राडा घालत आहेत. (म्हणजे निदान मराठी माध्यमे त्याच्या बातम्या तरी जोरदार चालवत आहेत.) कार्यकर्त्यांच्या मनातला संताप समजून घेता येऊ शकतो. परंतु केवळ कार्यकर्त्यांच्या मनातला संताप हे एखाद्या नेत्याचे राजकीय भवितव्य ठरवू शकतात का?? याचा विचार संबंधीत नेत्याने करायला नको का?? की अशा दबावापुढे झुकून कोणत्याही राजकीय पक्षात नाही अतिवरिष्ठ नेते कोणते निर्णय घेत असतात??What will really Pankaja munde get with rebellion mood of her supporters?

     समर्थकांची ताकद विजयी का झाली नाही?

    पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा संताप मर्यादेपर्यंत समजू शकतो. परंतु मग पंकजा मुंडे अडीच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीला 20000 मतांनी का पराभूत झाल्या?? आज संतप्त असलेले कार्यकर्ते त्यावेळी पंकजा मुंडे यांचा विजय खेचून का आणू शकले नाहीत?? याची उत्तरे स्वतः पंकजा मुंडे आणि आजचे संतप्त कार्यकर्ते देणार आहेत का?? पंकजा यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सभा घेतल्या होत्या. परंतु पंकजा मुंडे यांना अपयश आले. तेव्हा देखील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांविरुद्ध विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध आगपाखड केली होती. अशी आगपाखड देखील राजकीय स्पर्धेत समजून घेता येऊ शकते. परंतु नुसती आगपाखड पंकजा मुंडे यांचे पुढचे किमान 20 वर्षातले राजकीय भवितव्य घडवू शकेल का?? हा प्रश्न कदाचित समर्थकांना पडणार नाही, पण खुद्द पंकजा मुंडे यांनाही एवढी राजकीय प्रगल्भता नाही का??



    गोपीनाथ मुंडेंची बंडखोरी सहन केली होती?

    आज मोदी – शहा – नड्डा यांचा भाजप आहे. तो तर सोडूनच द्या, पण जेव्हा वाजपेयी – अडवाणी यांचा भाजप होता, तेव्हा तरी अशाप्रकारे समर्थकांच्या मार्फत दबाव आणून, समर्थक रस्त्यावर उतरवून कोणाचे राजकारण वाजपेयी – अडवाणी यांच्या भाजपने सहन केले होते का?? इतिहास काय सांगतो?? गोपीनाथ मुंडे देखील पक्षावर जरूर नाराज होते. त्यांनी देखील नाराजीचे अनेक मार्ग अवलंबले होते. परंतु त्यांनी स्वतः आतातायीपणा केला नव्हता. केंद्रीय नेतृत्वाशी ते बदलल्यानंतर देखील म्हणजे नितीन गडकरी अध्यक्ष झाल्यानंतर देखील त्यांनी जुळवून घेतले होते. हा राजकीय इतिहास पंकजा मुंडे यांना माहिती नाही का??

     राष्ट्रीय सचिव पद एवढे “हलके”??

    पंकजा मुंडे यांच्याकडे असणारे सध्याचे राष्ट्रीय सचिव पद आणि मध्य प्रदेश सह प्रभारी म्हणून असलेला कार्यभार त्यांना “एवढा हलका” वाटतो, की त्याच्यापुढे विधान परिषदेची उमेदवारी देखील मोठ्या मातब्बरीची वाटावी?? नेमके काय आहे?? पंकजा मुंडे आपल्या समर्थकांना मार्फत स्वतःचे नेमके कोणते राजकारण साधू इच्छित आहेत??

    राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक बंडखोरी सहन करतो?

    भाजपसारखा राष्ट्रीय पातळीवरचा प्रबळ पक्ष कोणत्याही प्रादेशिक नेत्यांची बंडखोरी फार मर्यादित अर्थाने सहन करतो. त्यांना संधी देतो. अन्यथा त्यांना त्यांची मर्यादा दाखवून देणे फारसे अवघड नसते. पंकजा यांना याच स्वरूपाची वर्तणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अपेक्षित आहे का?? या प्रश्नांची उत्तरे फार दूर नाहीत. येणाऱ्या भविष्यात ती निश्चित मिळतील. पण ती पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्यासाठी अनुकूल असतीलच याची खात्री कोणालाही देता येणार नाही!!

    … आणि पंकजा मुंडे जर पक्षाबाहेर पडून काही “स्वतंत्र विचार” करण्याचा मनसूबा राखत असतील तर मग धनंजय मुंडे यांच्यासाठी भाजपच्या मार्ग मोकळा होईल हे त्या विसरतात आहेत का?? प्रश्न अनेक आहेत… उत्तरे पंकजा मुंडे यांच्या स्वतःच्या राजकीय वर्तवणुकीत दडली आहेत!!

    पंकजा मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत. मग केवळ एका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर ही महत्त्वाकांक्षा विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यासाठी समर्थकांचा रस्त्यावर राडा होण्यापर्यंत खाली यावी??… पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास उंचीवर नेणारा आहे?? की खाली खेचणार आहे?? हे खुद्द त्यांनीच ठरवायचे आहे!!

    What will really Pankaja munde get with rebellion mood of her supporters?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!