• Download App
    कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे? नवीन लक्षणे जाणून घ्या; उपाय कोणते ते पाहाWhat is the new Delta Plus variant of the Corona? Learn new symptoms; See what the solution is

    Covid Delta Plus Variant : कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट काय आहे? नवीन लक्षणे जाणून घ्या; उपाय कोणते ते पाहा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात तो आढळला आहे. कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या. What is the new Delta Plus variant of the Corona? Learn new symptoms; See what the solution is

    कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच B.1.617.2 प्रथम भारतात आढळला. कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस तयार झाला. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.

    वेगाने पसरतोय डेल्टा प्लस व्हेरियंट

    कोरोनाच्याआतापर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वात वेगात पसरत आहे. अल्फा प्रकारही वेगवान पसरत असला तरी, डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. डेल्टा प्रमाणेच कप्प्या व्हेरियंटही लसीला चकवा देण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, हा प्रकार फारसा पसरला नाही. पण, आता सुपर-स्प्रेडर डेल्टा व्हेरियंटने लोकांना घाबरवले आहे.

    कोरोनाच्या डेल्टा प्लसची लक्षणे

    •  ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे
    •  छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास
    •  त्वचेवर पुरळ, बोटांच्या रंगात बदल ही लक्षणे
    •  सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसारचा समावेश

    प्रादुर्भाव कसा टाळता येईल ?

    •  घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला
    •  आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा
    •  २० सेकंद तरी साबणाने हात स्वच्छ धुवा
    •  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, ६ फूट अंतर ठेवा
    •  घरातल्या, आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा
    •  बाहेरच्या वस्तूंना निर्जंतुकीकरणानंतरच स्पर्श करा

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…