• Download App
    सुपरनोव्हा म्हणजे नेमके काय? What is supernova

    सुपरनोव्हा म्हणजे नेमके काय?

    खगोलशास्त्राची दुनियाच इतकी न्यारी आहे की त्याचा अभ्यास किती कराल तितका तो धोडा आहे. आपणास केवळ एक सूर्य दिसतो. त्याच्या उर्जेवर पृथ्वीवरील सारी जीवसृष्टी अवलंबून आहे. आकाशगंगेत असे अनेक सूर्य आहेत आणि अवकाशात अनेक आकाशगंगा आहेत. त्यावरून आपल्याला अवकाश किती अथांग आहे याची पुसटशी कल्पना यायला हरत नाही. What is supernova

    अवकाशातील अनेक बाबीचा आपल्याला उलगडा होत नाही त्यामुळे त्याभोवती रहस्यकथा निर्माण होतात. हा रहस्यभेद करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ नेहमी धडपड करीत असतात सतत अभ्यास करीत असतात. त्यातून नवी व आश्वासक माहिती मिळत असते. सुपरनोव्हा ही अशीच एक कन्सेप्ट आहे. सुपरनोव्हा म्हणजे काय याबाबत अनेक वर्षे अनभिज्ञता होती.

    मात्र शास्त्रज्ञांनी अथक परीश्रमानंतर ती दूर केली. जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो त्या कोसळणाऱ्या तार्या ला सुपरनोव्हा म्हणतात. सुपरनोव्हानंतर तार्या्चे प्रचंड द्रव्य आतल्या बाजूला कोसळते. या द्रव्याचा दाब इतका प्रचंड असतो की अणूंमधील इलेक्ट्रॉन बंध तुटतात आणि तार्यातचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणती तार्या चे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते.

    अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार न्यूट्रॉन तारा, पल्सर वा कृष्णविवर बनतो. आकाराने प्रचंड मोठ्या तार्यााचे जेव्हा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते तेव्हा तो स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने इतका लहान होत जातो की शेवटी तो जवळ जवळ अदृश्यच होतो. यावेळी तो अमर्याद लहान व कमालीचा जड बनतो. या एका अदृश्यरूप बिंदूला सिंग्युलॅरिटी असे म्हणतात.

    ही अशी एक अवस्था जी कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असते की जिथे भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. या बिंदूरूप अवस्थेभोवती अदृश्य कुंपण निर्माण होते. त्या कुंपणाला घटना क्षितिज म्हणजेच इव्हेंट होरयझन असे म्हणतात. घटना क्षितिज हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा की जिच्या पलीकडून परतणे शक्य नाही.

    What is supernova

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!