• Download App
    एल निनो म्हणजे नेमके काय रे भाउ ?|What exactly is El Nino

    विज्ञानाची गुपिते: एल निनो म्हणजे नेमके काय रे भाउ ?

    दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्या वरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला हवामानशास्त्रात एल निनो म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे वातावरण आणि पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील पाणी यांच्यामधील आंतरक्रिया हा एक वातारणीय आविष्कार एल निनोच्या रूपाने घडत असतो. २०० उत्तर ते २०० दक्षिण या अक्षांशांदरम्यान घडणारा हा आविष्कार दर २ ते ७ वर्षांनी घडतो.What exactly is El Nino

    सर्वसाधारणपणे याची सुरुवात एका वर्षाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी होते व पुढील वर्षातील वसंत ऋतूपर्यंत तो असतो. एल निनोचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागातील जलवायुमान नेहमीपेक्षा अधिक दमट होते, तर वायव्य पॅसिफिक महासागरात ते नेहमीपेक्षा अधिक कोरडे होते. १९८२-८३ पासून हा आविष्कार अधिक प्रखर होत गेलेला आहे.

    एल निनोचा हा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार सुमारे १८ महिने राहतो आणि पुष्कळदा त्याच्यानंतर विरुद्ध प्रकारचा ला निना हा आविष्कार घडतो. ला निनाचा प्रभाव सामान्यपणे डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. विसाव्या शतकात एल निनो २३ वेळा व ला निनो १५ वेळा घडल्याचे मानतात. दर हिवाळ्यात दक्षिण अमेरिकेतील इक्वादोर व पेरू या देशांच्या समुद्रकिनार्यासलगत उबदार सागरी प्रवाह दक्षिणेकडे वाहतो. एल निनो हा मुलगा या अर्थाचा स्पॅनिश शब्द असून तो बाल येशू संदर्भात वापरला जातो.

    एकोणिसाव्या शतकात स्थानिक मच्छीमारांनी या प्रवाहाला एल निनो हे नाव दिले. दर २ ते ७ वर्षांनी येथील उष्ण प्रवाह नेहमीपेक्षा प्रबळ होऊन तो दीर्घकाल टिकतो. या कारणांमुळे संपूर्ण उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरी प्रदेशातील वारे व वर्षण यांच्यात खूप बदल होतात. अशा नेहमीपेक्षा प्रबळ व दीर्घकालीन उष्ण प्रवाहांच्या कालावधीतील वातावरण व महासागर यांच्यातील संपूर्ण आंतरक्रियेसाठी हळूहळू एल निनो ही संज्ञा वापरली जाऊ लागली.

    स्पॅनिश वसाहतकार फ्रांथीस्को पिझारो इ. स. १५२५ मध्ये पेरूच्या उत्तर भागात उतरले होते. त्या वेळी त्यांनी तेथील वाळवंटी प्रदेशातील असामान्य पर्जन्यवृष्टी अनुभवली. या आविष्काराबद्दल त्यांनी केलेल्या नोंदी हाच एल निनोबद्दलचा पहिला लिखित पुरावा होय.

    What exactly is El Nino

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!