• Download App
    West Bengal:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यपाल जगदीप धनखर यांच्या सोबत चर्चा West Bengal: Prime Minister Narendra Modi's discussion with Governor Jagdeep Dhankhar

    West Bengal:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यपाल जगदीप धनखर यांच्या सोबत चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी  हिंसाचार केल्याच्या अनेक  घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बंगालमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल जगदीप धनखर यांनी दिली आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.West Bengal: Prime Minister Narendra Modi’s discussion with Governor Jagdeep Dhankhar

    पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा करताना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे.

    तृणमूल काँग्रेसचे समर्थक भाजपा समर्थकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा दावा भाजपाने केलाय. भाजपाबरोबरच डाव्या पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केलाय.

    पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवलं आहे. २ मे रोजी निकाल समोर आल्यानंतर कोलकातामधील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपाच्या कार्यकार्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

    राज्याच्या काही भागात हिंसाचाराचा उद्रेक झाल्याचे वृत्त आल्याच्या पाश्र्वभूमीवर ममतांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि चिथावणीला बळी न पडण्याचे आवाहन केले. निवडणुकीदरम्यान केंद्रीय दलांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आरोप यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला.

    West Bengal: Prime Minister Narendra Modi’s discussion with Governor Jagdeep Dhankhar

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??