• Download App
    WEST BENGAL : कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यादरम्यान लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ताने मारली अनेक पाकिटे .... डायरीत लिहिला मारलेल्या पकिटांचा हिशोबWEST BENGAL: Popular actress Rupa Dutta stole several wallets during Kolkata International Book Fair...

    WEST BENGAL :लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता- शिवसेना-ममता बॅनर्जींची कट्टर आलोचक-पाकिटमार ?…. डायरीत लिहिला म्हणे मारलेल्या पकिटांचा हिशोब…

    • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या परखड टीकाकार आणि बॉलीवूड आणि बंगाली चित्रपटांची अभिनेत्री रुपा दत्ता हिला शनिवारी (१२ मार्च) कोलकाता पोलिसांनी अटक केली. पोलिसांचा आरोप आहे की रूपा कोलकाता बुक फेअरमध्ये खिसा मारत होती.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता :बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता  हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  रूपा दत्ताला पोलिसांनी पाकीट मारल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रूपा दत्ता या ममता बॅनर्जींना थेट आव्हान देतात .नुकत्याच झालेल्या गोवा निकालानंतर त्यांनी ममता बॅनर्जींवर चांगलेच मेमे शेअर केले होते.WEST BENGAL: Popular actress Rupa Dutta stole several wallets during Kolkata International Book Fair.

    रूपा दत्ता काँग्रेस, शिवसेना आणि पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतात. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी गेलेल्या ममता बॅनर्जी यांचा एक मेम व्हिडिओ 11 मार्च रोजी शेअर करण्यात आला होता.

    एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यात बॅग टाकताना पाहिले होते. त्यानंतर महिलेला संशयाच्या आधारे पकडण्यात आले.ही घटना कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याची आहे.

    गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पराभवाचीही त्यांनी ट्विटरवर खिल्ली उडवली. टाटा, बाय बाय, अल्लाह हाफिज, खुदा हाफिज खेल सेश… असे ट्विट त्यांनी केले.

    पोलिसांनी कचऱ्यात फेकताना पाहिली होती बॅग

    संशय आल्याने महिलेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासात महिलेसोबत बरीच रोकड पकडल्याचे समोर आले आहे. यानंतर महिलेची चौकशी करण्यात आली. बॅगची झडती घेतली असता पोलिसांना आणखी अनेक पाकिटे सापडली. या बातमीने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे की, एवढी लोकप्रिय अभिनेत्री असे कसे काय करू शकते?

    तपासात महिलेने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. जत्रा, कार्यक्रम आणि माणसांची गर्दी असलेल्या ठिकाणी ती महिलांचा खिसा मारते. अशा स्थितीत ही महिला आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यातही पोहोचली जिथे तिला हे कृत्य करताना पकडण्यात आले.

    ७५ हजारांची रोकड

    माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीकडून जवळपास ७५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. रूपा दत्ता तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी रुपा दत्ताने प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवरही लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिने अनुरागवर फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

    अभिनेत्रीकडून एक डायरीही सापडली असून, त्यात आतापर्यंतच्या सर्व रकमेचा हिशोब नोंदवला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ती हे सर्व का करत होती हे लवकरच कळेल.

    रुपा दत्तानेही चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी लिहिले , “रिया चक्रवर्ती केवळ सुशांतची गर्लफ्रेंड नाही तर आदित्य ठाकरेची प्रेयसीही होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांना रियाला वाचवायचे आहे. सुशांतच्या हत्येत आदित्य ठाकरेचाही हात आहे.

    WEST BENGAL: Popular actress Rupa Dutta stole several wallets during Kolkata International Book Fair.

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!