- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार नाराजी
विशेष प्रतिनिधी
बीड :भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच करू, असं वक्तव्य गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी बीडमध्ये केले आहे. We will welcome Pankaja Munde in Shiv Sena
पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर आमचे नेते त्यांचा मान सन्मान करतील, असे देखील देसाई म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही म्हणून पंकजा मुंडे नाराज होत्या, त्यामुळे त्या सेनेच शिवबंधन हाती बांधतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला होता. याच प्रश्नावर शंभूराजे यांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
- पंकजा मुंडे यांचे शिवसेनेत आल्यास स्वागत
- केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान नाही
- पंकजा मुंडे नाराज होत्या
- त्या शिवबंधन हाती बांधतील
- आमचे नेते त्यांचा मान सन्मान करतील