विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचप्रमाणे रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून बेडच्या कमतरतेमुळे आणि ऑक्सिजन अभावी काहींना जीवही गमवावा लागला आहे. या परिस्थितीतमुळे राज्य सरकारवर टीका केली जातेय. तर मराठी अभिनेता आस्ताद काळे यांनेही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. We will question everyone in power Actor Astad Kale got angry
आस्ताद काळेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. त्याने म्हटले की, “प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…..नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….निरोप घेतो….”
आस्तादप्रमाणेच नुकतंच नेतेमंडळींसंदर्भात बोलताना मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केलेत. इन्स्टाग्रामच्या स्टोरीमार्फत केदार यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!”
We will question everyone in power Actor Astad Kale got angry
महत्वाच्या बातम्या
- सीरमने कमी केली कोव्हिशिल्ड लसीची किंमत, आता राज्यांना 400 ऐवजी 300 रुपयांत मिळणार डोस
- लसीसाठी नोंदणी करूनही का मिळत नाहीये स्लॉट?, केव्हा मिळेल? कोविन प्रमुखांनी दिली ही उत्तरे, वाचा सविस्तर…
- ‘कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….!अभिनेता आस्ताद काळे राज्य सरकारवर संतापला
- बिसीसीआय कडून बायो बबलचे नियम अधिक कडक ! दर दोन दिवसांनी टेस्टिंग बाहेरील जेवणाला परवानगी नाही
- पुण्यात लसीचा साठा संपला ! ; 150 लसीकरण केंद्रे बंद राहणार