• Download App
    मराठा आरक्षणावर गप्प बसणार नाही, पण ही मोर्चे काढण्याची वेळ नाही, छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन We will not remain silent on Maratha reservation, but this is not the time to hold a march, appeals Chhatrapati Sambhaji Raje

    मराठा आरक्षणावर गप्प बसणार नाही, पण ही मोर्चे काढण्याची वेळ नाही, छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

    मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निर्णयावर समाजात सर्वत्र नाराजी आणि अस्वस्थता आहे. समस्येवर मार्ग निघण्यासाठी मी सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. मात्र, सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. 


    प्रतिनिधी

    पुणे : मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निर्णयावर समाजात सर्वत्र नाराजी आणि अस्वस्थता आहे. समस्येवर मार्ग निघण्यासाठी मी सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. मात्र, सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. We will not remain silent on Maratha reservation, but this is not the time to hold a march, appeals Chhatrapati Sambhaji Raje

    पुण्यात पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आता मोर्चा काढण्यात काही अर्थ नाही. मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मार्ग काढण्यात येईल. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल.


    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची घोषणा


    संभाजीराजे म्हणाले, अनेक राजकीय पक्ष सध्या वेगवेगळ्या प्रकारे मत व्यक्त करत आहेत. मात्र, ती माझी भूमिका नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात बराच अभ्यास केला आहे. १०२ वी घटनादुरुस्ती, अ‍ॅटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलेन. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशीही चर्चा करणार आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रक काढून यासंदभार्तील घोषणा केली होती. मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल. महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल, असे भाजपाने म्हटले आहे.

    We will not remain silent on Maratha reservation, but this is not the time to hold a march, appeals Chhatrapati Sambhaji Raje

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…