वृत्तसंस्था
गुवाहाटी – आसाममध्ये दोन मुले धोरण (two-child policy) लागू करणार. सरकारी सवलती पाहिजे असतील, तर हा नियम पाळला पाहिजे, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी केला आहे. ही सरकारची अधिकृत घोषणा आहे, असे समजायला हरकत नाही, असे विश्वशर्मा म्हणाले. We will gradually incorporate a two-child policy for availing govt benefits. You can consider this an announcement: Assam CM Himanta Biswa Sarma
आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू केले आहे, असे सांगून विश्वशर्मा म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळवायचे असतील, तर लोकसंख्या धोरणाचे निकष सगळ्यांना पाळावेच लागतील. कर्जमाफीच्या योजनांना देखील हे निकष लागू राहतील. सध्या हे निकष एस.सी. एस.टी. समूदाय आणि चहाच्या मळ्यातील कामागारांना लागू राहणार नाहीत. भविष्यात सगळ्या सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी लोकसंख्या नियंत्रण धोरणाचे निकष लागू राहतील, असे विश्वकर्मा यांनी स्पष्ट केले.
आसाममध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या घुसखोरीची समस्या मोठी आहे. घुसखोर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये बेकायदा घुसतात आणि येथील मुलींशी लग्न करतात. त्यांची अपत्ये भारतीय भूमीत जन्माला आल्यामुळे भारतीय नागरिक बनतात. घुसखोरीचा हा सिलसिला बरीच वर्षे चालू राहिला आहे. त्यामुळे आसामची आणि पश्चिम बंगालची मूळ लोकसंख्या अल्पसंख्याक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. यातून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत.