Wednesday, 7 May 2025
  • Download App
    चीनच्या कुरापतीला जशाच तसे उत्तर; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सज्जड इशारा | The Focus India

    चीनच्या कुरापतीला जशाच तसे उत्तर; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सज्जड इशारा

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर एएनआयला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. सिंह म्हणाले, आम्हाला सर्व राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध कायम ठेवायचे आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  : भारताची कुरापत काढणाऱ्या चीनसह कोणत्याही देशाला सोडणार नाही. त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.We want to maintain peaceful relations with all nations: Defence Minister Rajnath Singh

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर एएनआयला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. सिंह म्हणाले, आम्हाला सर्व राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध कायम ठेवायचे आहेत. पण, सीमेवर चीननेच तणाव वाढविला आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरू आहे. परंतु तोडगा निघालेला नाही. लष्करी पातळीवर पुढील चर्चेची फेरी होईल. जी कधीही होऊ शकेल. परंतु तेथे यथा स्थिती आहे. पण, परिस्थिती नियंत्रणात आहे. ते म्हणाले, ” लडाख सीमेवर परिस्थिती ही एक सकारात्मक प्रगती आहे, असे मला वाटत नाही. बोलणी चालू आहेत आणि त्यांचा सकारात्मक परिणाम होईल, ही आमची अपेक्षा आहे.”

    लडाखमधील तिढा सोडविण्यासाठी चीनशी राजनैतिक आणि सैन्य पातळीवरील चर्चेतून कोणताही “अर्थपूर्ण तोडगा निघालेला नाही”, असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषेजवळील भागात सैन्य कपात करता येणार नाही. “सीमेवर त्रास देणाऱ्या कोणालाही भारत सोडणार नाही”, असे ते म्हणाले.

    पूर्व एप्रिलच्या अगोदर पूर्व लडाखच्या सर्व भागात संपूर्ण सैन्य माघार आणि पूर्वस्थितीसाठी भारत चीनवर दबाव आणत आहे. परंतु कोणताही ठराव झाला नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेनंतर ऑगस्टमध्ये चीनने सैन्य माघारीची प्रक्रिया अर्ध्यावर सोडली. पैंगोंन सरोवराजवळ सैन्य तळ ठोकून आहे. ते माघारी घ्यावे, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे.

    जगातील कोणत्याही विस्तारवादी आणि भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जशाच तशे उत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे.
    जम्मू-काश्मीरमधील नुकत्याच पार पडलेल्या डीडीसी निवडणुकीत फुटीरतावाद आणि दहशतवाद पराभूत झाला आहे आणि लोकशाही जिंकली आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

    We want to maintain peaceful relations with all nations: Defence Minister Rajnath Singh

    सिंह म्हणाले, धर्मांतराला माझा विरोध आहे. सामूहिक धर्मांतरही रोखले पाहिजे. माझ्या माहितीनुसार, मुस्लिम धर्मात, दुसर्‍या धर्मातील कोणाबरोबर लग्न करता येत नाही. लग्नासाठी धर्मांतर करण्यास वैयक्तिकरित्या मान्यता नाही. धर्मपरिवर्तन रोखणाऱ्या कायद्याचे त्यांनी समर्थन केले.

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??