• Download App
    Big B : सिंह सी दहाड़ कर...रुके न तू, थके न तू ! We will win ! we fight...come together...we will win : Big B

    Big B : सिंह सी दहाड़ कर…रुके ना तू ,थके ना तू ! We will win !

    ‘रुके ना तू, धनुष उठा प्रहार कर,
    तू सबसे पहला वार कर,
    अग्नि सी धधक-धधक,
    हिरण सी सजग-सजग,
    सिंग सी धहाड़ कर,
    शंख सी पुकार कर,
    रुके ना तू थके ना तू, झुके न तू ‘!


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी कोविड योद्धे गेल्या वर्षापासून लढत आहे. अशात कोरोना वॉरीअर्सला प्रोत्साहित करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी एक कविता सादर केली आहे. सध्या बिग बींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.we fight…come together…we will win : Big B

    या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत २ कोटी रुपये दान केले आहेत आणि आता ते लोकांना या संकटात एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.

    धनुष्य उठा प्रहार कर, तू सब से पेहला वार कर…
    ‘एक योद्धा कधीही हार मानत नाही. आपल्या ताकदीने तो मैदानात उतरतो आणि विजय मिळवतो.असं म्हणत त्यांनी कोरोना वीरांना प्रोत्साहित केलं आहे.

    या व्हिडीओत ते प्रसून जोशी यांची कविता रुके ना तू सादर करत लोकांना या संकटासमोर हार मानू नका असे सांगत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, रुके ना तू, एकत्रित येऊन आपण लढू आणि जिंकू.

    https://www.instagram.com/tv/COxKpRXhsTl/?utm_source=ig_web_button_share_sheet

    यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी होपवर एक कविता ऐकवली आहे. जी या संकटात लोकांना एकत्रित येण्यासाठी प्रेरीत करते.

    अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोविड केअर सेंटर बनवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. ३०० बेड्स असलेल्या या कोविड सेंटरचं नावं ‘श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटी’ असं ठेवण्यात आलं आहे. या कोविड केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी सुविधांची व्यवस्था असणार आहे.

    https://www.instagram.com/tv/COu-DQ9BzOK/?utm_source=ig_web_button_share_sheet

    बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन गेल्या वर्षभरापासून कोरोना योद्ध्यांसह अनेक गरजू कुटुंबियांना आपल्या परीने मदत करत आहेत.

    we fight…come together…we will win : Big B

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट