• Download App
    अबब, आपण तब्बल ९० लाख कोटी जीवांना पोसतो We feed as many as 90 lakh crore organisms

    विज्ञानाची गुपिते : अबब, आपण तब्बल ९० लाख कोटी जीवांना पोसतो

    आपण किती जिवांना पोसतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. एक आई आपल्या बाळांना जन्म देते, बाळाचे पालनपोषण करते. एका आईला एकंदर आयुष्यात अनेक बाळे होऊ शकतात, त्यामुळे तितक्या जीवांचे पालनपोषण ती करते असे आपण सहजपणे म्हणू शकतो. we feed as many as 90 lakh crore souls

    पुरुष कुटुंबप्रमुख शेती, व्यवसाय, व्यापार, नोकरी, काम, धंदा असे काही ना काही करून अर्थार्जन करतो, घरात पैसा मिळवून आण तो. त्या पैशावर घरातल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्या वस्तू, धान्य वगैरे विकत आणले जाते. त्या अर्थाने तो प्रौढ पुरुष कुटुंबप्रमुख घरातल्या सर्व जीवांना पोसतो. काही घरांमध्ये मांजर, कुत्रा, पोपट, लव्ह बर्डस्, मासे, कबुतरे, गाई, म्हशी वगैरे प्राणी – पक्षी पाळलेले असतात. त्यांनाही कुटुंबाकडून किंवा आपल्याकडून आपण पोसतो. असे सजीव आपण स्वेच्छेने पोसतो. पण घर म्हटलं तर त्यामध्ये आपण न पाळलेले; पण घरात वस्ती करून राहिलेले उंदीर, घुशी वगैरे जीव असतात. त्यांना पोसण्यासाठी एकप्रकारे आपणच कारणीभूत असतो.

    आपली जेवणं झाली की अन्नाचे कण, खरकटे-मरकटे इत्यादी घरात असल्यामुळे त्यावर मुंग्या, झुरळं वगैरे कीटक यथेच्छ गुजराण करतात म्हणजे त्यांनाही आपण पोसतो. शिवाय आपण पोसलेल्या या मुंग्या, झुरळं वगैरे कीटकांना खाऊन पाली वगैरेंसारखी प्राणी जगतात, म्हणजे पालींनाही आपणच पोसतो. आपल्याला नको असलेले हे जीव आपल्या अन्नावर, धान्यावरच तर जगतात.

    f

    तर आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले पण आपण पोसत असलेले सगळे मिळून किती जीव असतील याचा हिशोब केला तर तो आकडा किती येईल? दहा-बारा? शंभर-दोनशे? हजार? लाख? यातला कुठलाही आकडा तुम्ही सांगितलात तरी तो थिटा पडेल. अगदी कोटी, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म हे आकडेही अपुरे पडतील इतक्या जीवांना तुम्ही पोसत आहात. शरीरशास्त्राचा अभ्यास करणार्या वैज्ञानिकांनी हा तर आकडा ९० लाख कोटी इतका असल्याचा अंदाज केला आहे. ९० लाख कोटी म्हणजे ९ वर १४ शून्ये.

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!