Tuesday, 6 May 2025
  • Download App
    आपण लढाई जिंकू शकतो, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राबविणार पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड कार्यक्रम We can win the battle, Rashtriya Swayamsevak Sangh launches Positivity Unlimited program to build trust in people's minds

    आपण लढाई जिंकू शकतो, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राबविणार पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड कार्यक्रम

    कोरोनाविरुध्दची लढाई आपण जिंकू शकतो हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य वतीने पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत, विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मुर्ती या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. We can win the battle, Rashtriya Swayamsevak Sangh launches Positivity Unlimited program to build trust in people’s minds


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोनाविरुध्दची लढाई आपण जिंकू शकतो हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य वतीने पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत, विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मुर्ती या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

    जनतेचं मनोबल उंचावणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच महामारिशी मुकाबला करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणंही त्यामागचा हेतू आहे. आपण लढाई जिंकू शकतो, ही आशा लोकांमध्ये आम्हाला निर्माण करायची आहे, असं संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमचे संयोजक निवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी सांगितलं.

    संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमने या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात सदगुरू जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, निर्मल संत आखाडाचे ज्ञानदेवजी आणि तिरपंथी जैन समाजाचे जैन मूनी प्राणनाथ या चार दिवसीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. चार दिवस प्रत्येक दिवशी दोन व्यक्ती 15 मिनिटे चर्चेत सहभागी होणार आहे. या संकटाच्या काळात पॉझिटिव्ह राहता यावं आणि सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करावा, यासाठी हा कार्यक्रम होणार आहे.

    संघाने कोरोना महामारीच्या काळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. नागरिकांना अन्नाची पाकिटे पुरविण्यापासून ते कोव्हिड केअर सेंटरच्या उभारणीपर्यंत अनेक उपक्रम केले जात आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यांना या धास्तीतून बाहेर काढण्यासाठी देशभरातील विविध मान्यवरांकडून आवाहन केले जाणार आहे.

    We can win the battle, Rashtriya Swayamsevak Sangh launches Positivity Unlimited program to build trust in people’s minds

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    Icon News Hub